बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: तालुक्‍यातील जामगाव (पान) वैराग येथील राजरोस सुरु असलेल्‍या अवैध दारुविक्रीच्‍या विरोधात महिलांन दोन पाऊले पुढे टाकून दारु पकडून वैराग पोलिसांच्‍या ताब्‍यात दिली.
    याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी तालुक्‍यातील जामगाव (पान) वैराग ग्रामपंचायतीस दारुबंदीचा ठराव करण्‍यास गावातील महिलांनी भाग पाडले. तरी देखील अवैध दारुविक्री सुरु राहिल्‍याने जिल्‍हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्‍याकडे लेखी तक्रारी दिल्‍या. यानंतरही हे धंदे सुरु राहिल्‍याने महिलांनी शेवटी स्‍वत:च पोलिसांचे काम करत दारु विक्री करणा-याचा पाठलाग करुन रंगेहाथ पकडण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु मोठ्या संख्‍येने महिला आलेल्‍या पाहू ते त्‍या ठिकाणी साहित्‍य टाकून विक्रेता पळून जाण्‍यात यशसवी झाला. सदरच्‍या घटनेनंतर महिलांनी वैराग पोलिसात सदरची दारु आणून दाखविली व सदरच्‍या व्‍यक्‍तींवर गुन्‍हे दाखल करण्‍याबाबत सांगितले. परंतु वरिष्‍ठांशी चर्चा करुन गुन्‍हे दाखल करण्‍यात येईल, असे सांगून रात्री उशीरापर्यंतही कोणत्‍याही प्रकारचे गुन्‍हे दाखले झाले नाही. याबाबत गावातील महिला आंदोलन करणार असल्‍याचे सांगत आहेत.
 
Top