बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वैराग (ता.बार्शी) येथील बेरड गल्लीतील अष्टभुजा भवानी देवस्थान मंदिराच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्‍त जनावरांच्या पाण्यासाठी पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला.
     या पाणपोईचे उद्घाटन सौ. सिंधूताई व पांडूरंग भोंगाळे या दांपत्यांच्या हस्ते करण्यात आले. सौ.सुरेखा व लक्ष्‍मण पिचके या दांपत्यांनी याचे आयोजन केले होते.     वर्धापनानिमित्‍त आयोिजत सत्यनारायण महापूजा, देवीची आरती, पूजापाठ इ. धार्मिक विधी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मारुती गायकवाड, भाऊसाहेब नूवरे, उल्हास पिचके, दत्ता पिचके, बाबा फकिर, माणिक मोरे, बालाजी गायकवाड, अंबादास पिचके, भरत भोंगाळे, युन्नुस शेख, शंकर भोंगाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्‍िथत होते.
 
Top