पुणे :- शासनाने समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवूणक तसेच सुलभ मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल. असे पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी कळविले आहे.
    विभागस्तर महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त हे असतील. दोन भाप्रसे अधिकारी (वरिष्ठ महिला) सदस्य तर विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. विधान भवनात दुस-या सोमवारी सकाळी 11 वाजता कामकाजास प्रारंभ होईल.
    अर्जदारांची विहित नमुन्यातील तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावयाचे आहेत. तालुका स्तरावर चौथ्या सोमवारी तर जिल्हास्तरावर तिस-या सोमवारी आणि राज्यस्तरावर महिला दिनाचे दुस-या सोमवारी आयोजन करण्यात येणार आहे.
    महिला लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे तसेच आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज व सेवा व आस्थापना विषयक बाबी, स्विकारता येणार नाहीत असेही विभागीय आयुक्तांनी कळविले आहे.
 
Top