बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शिवसेना बार्शी शहर व तालुका महिला आघाडीच्‍यावतीने महिला दिनानिमित्‍त आयोजित केलेल्‍या न्‍यू होम मिनिस्‍टर व खेळ पैठणीचा हा स्त्रियांसाठीचा कार्यक्रम मोठ्या उत्‍स्‍फुर्त सहभागाने संपन्‍न झाला.
    शिवसेनेचे बार्शी विभागाचे प्रमुख भाऊसाहेब आंधळकर यांनी क्रांती (नाना) मळेगावकर यांच्‍या न्‍यू होम मिनिस्‍टर व खेळ पैठणीचा हा गप्‍पा गोष्‍ट, उखाने, रंजक खेळ, हिंदी-मराठी गाणी याबरोबरच गावरान कॉमेडीचा तकडा यासह भरगच्‍च कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
    सोमवारी सायंकाळी भगवंत मैदानावर झालेल्‍या या कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक सौ. सुरेधा धस, नायब तहसिलदर शांतराम सांगडे, नागजी नान्‍नजकर, बार्शी परिवर्तन आघाडीच्‍या अध्‍यक्षा सौ. सीमा आंधळकर, मातोश्री इंदुमती आंधळकर, शिवसेना महिला तालुका प्रमख सौ. मंगल पाटील, महिला शहरप्रमुख मनिषा नान्‍नजकर, शहरप्रमुख दिपक आंधळकर, बाबासाहेब कापसे आदीजण उपस्थित होते.
    महिलांच्‍या कार्यक्रमात सहभागी झालेल्‍या तसेच याचा आनंद घेणा-यांनाही यामध्‍ये विविध बक्षीसे देण्‍यात आली. बार्शीची पहिला महिला होम मिनिस्‍टर म्‍हणून मानाचा पैठणीचा सन्‍मान बार्शीच्‍या हर्षला बजंत्री यांना मिळाला. द्वितीय क्रमांकातील सौ. राजश्री व संतदेव यांना शिलाई मशिन तर तृतीय क्रमांकाच्‍या सौ. सुवर्णा जाधव यांना मिक्‍सर, चतुर्थ क्रमांच्‍या सौ. रोहिणी लिगाडे यांना कुकर, पाचव्‍या क्रमाकांच्‍या सौ. रेखा वाघमारे यांना हातातील घड्याळ, कार्यक्रम समारंभाच्‍या ठिकाणी प्रत्‍येक महिलांना प्रवेश करताना लकी ड्रॉचे एक कुपन देण्‍यात आले. त्‍यातील ड्रॉमधून सौ. कल्‍पना प्रतिक मैंदरकर यांना बार्शीची महाराणी हा किताब तसेच होंडा कंपनीची डिओ ही दुचाकी भेट देण्‍यात आली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सौ. मंगलताई पाटील, युवा महिला तालुकाप्रमुख सौ. मनिषा विभुते, परिवर्तन आघडीप्रमुख सौ. ज्‍योती सावंत यांना प्रत्‍येकी होंडा कंपनीची डिओ ही दुचाकी भेट देण्‍यात आली. या तीन्‍हीही पदाधिका-यांना सौ. सिमा आंधळकर व सौ. मनिषा नान्‍नजकर यांच्‍या हस्‍ते दुचाकीची चावी प्रदान करण्‍यात आले. यावेळी शिवसेनेच्‍या वतीने बार्शीत दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्‍याची घोषणा करण्‍यात आली.
    मागील वर्षभरापासून प्रसिध्‍दीपासून दूर राहून तळागाळातील शिवसैनिकांसाठी काम करणारे भाऊसाहेब  आंधळकर यांनी महिला दिनाच्‍या कार्यक्रमानिमित्‍त पुन्‍हा एकदा राजकीय अस्तित्‍व दाखवून दिले. बार्शी शहरातील तसेच ग्रामीण भागातील मोठ्या संख्‍येनी महिलांनी सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. आम्‍ही केवळ बोलत नसून दाखवतो, असा विश्‍वास महिलांना दुचाकी देताना भाऊसाहेब आंधळकर यांना वाटत होता.
 
Top