उस्मानाबाद :- कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्रीयेडेश्वरी देवीची यात्रा दि. 24 ते 30 एप्रिल या कालावधीत  होणार आहे.  या यात्रेसाठी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.  दर्शनासाठी येणा-या भाविकांनी सुरक्षित प्रवासासाठी अधिकृत प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा. मालवाहतूक करणा-या वाहनातून प्रवास करु नये, असे आवाहन  पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, उस्मानाबाद यांन केले आहे.
       प्रवासी वाहना व्यतिरिक्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करण्याचे  भाविकांनी टाळावेत तसेच वाहनचालकांनीही आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवाशांची वाहतूक करण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top