उस्मानाबाद :- समाजात तंटा निर्माण होवू नये व गावाची शांतता धोक्यात येवू नये व गावात मुळातच तंटे निर्माण होणार नाही, तंटे निर्माण  झाल्यास लोकसहभाग, सामोपचाराने  मिटविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरु केली. या मोहिमेत निकाली काढण्यात आलेल्या तंट्यासंबंधी मुल्यमापन समिती तालुकानिहाय  समित्या सुरु करण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
       या तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून सदस्य व सचिव म्हणून संबधित तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काम पाहतील. या समितीवर सदस्य म्हणून संबधित पंचायत समितीचे सभापती, विधीज्ञ व एका पत्रकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
तालुकानिहाय समितीची रचना व सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. 
 
उस्मानाबाद तालुका : अध्यक्ष- तहसीलदार, सदस्य सचिव-पोलीस  निरीक्षक, पोलीस स्टेशन (ग्रामीण), सदस्य- पंचायत समिती सभापती, विधीज्ञ व्ही. एस. कुलकर्णी, पत्रकार रणजित दुरुगकर. 

उमरगा तालुका : अध्यक्ष- तहसीलदार, सदस्य सचिव-पोलीस  निरीक्षक, पोलीस स्टेशन, सदस्य- सभापती पंचायत समिती, विधीज्ञ ॲड. बी. एस. होळीकट्टी, पत्रकार अविनाश काळे.   

कळंब तालुका : अध्यक्ष- तहसीलदार, सदस्य सचिव-पोलीस  निरीक्षक, पोलीस स्टेशन, सदस्य- पंचायत समिती सभापती, विधीज्ञ डी. एन. वनवे, पत्रकार मंगेश यादव.

भूम तालुका : अध्यक्ष- तहसीलदार, सदस्य सचिव-पोलीस  निरीक्षक, पोलीस स्टेशन, सदस्य- पंचायत समिती सभापती, सहायक सरकारी अभियोक्ता अजित मोटे, पत्रकार- दिनेश पोरे .
    
तुळजापूर तालुका : अध्यक्ष- तहसीलदार, सदस्य सचिव-पोलीस  निरीक्षक, पोलीस स्टेशन, सदस्य- पंचायत समिती सभापती, विधीज्ञ सौ. ए.जी.कोकाटे, पत्रकार श्रीकांत नरहरी कदम.

परंडा तालुका : अध्यक्ष- तहसीलदार, सदस्य सचिव-पोलीस  निरीक्षक, पोलीस स्टेशन, सदस्य- पंचायत समिती सभापती, विधीज्ञ सी.डी.कांबळे, पत्रकार प्रमोद वेदपाठक.
    
लोहारा तालुका : अध्यक्ष- तहसीलदार, सदस्य सचिव-पोलीस  निरीक्षक, पोलीस स्टेशन, सदस्य- पंचायत समिती सभापती, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता  एस. एस. बिराजदार, पत्रकार निळू कांबळे.

वाशी तालुका : अध्यक्ष- तहसीलदार, सदस्य सचिव-पोलीस  निरीक्षक, पोलीस स्टेशन, सदस्य- पंचायत समिती सभापती, विधीज्ञ- डी.टी. वायबसे, पत्रकार मुकूंद चेडे हे सदस्य आहेत.

    सदर गठीत करण्यात आलेल्या जिल्हा मुल्यमापन समितीने शासन निर्णय दि. 14 ऑगस्ट 2008 अन्वये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कामकाज करण्यात यावे तसेच मुल्यमापन अहवाल मुदतीत पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांचेकडे सादर करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 
Top