उस्मानाबाद -: जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या क्रीडापटूना जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सन 2012-13 या वर्षाकरिता गुणवंत खेळाडू म्हणून अश्विनी तानाजी मोहीते (कुस्ती  आणि राजाभाऊ दत्तात्रय शिंदे (खो-खो)  यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. तर व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून रमेश दिगंबर बांगर (खो-खो) आणि  गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता म्हणून प्रा.डॉ. चंद्रजित भालचंद्र जाधव यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे  जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी कळविले आहे.

 
Top