उस्मानाबाद :- अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणा-या विक्रेत्यांकडून अन्न नमुने तपासून ते दोषयुक्त असल्याने त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कार्यवाही केली आहे. याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यावसायीकाकडून 21 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला.
       याबाबतची माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती  न.त. मुजावर यांनी ‍दि. 18 ऑक्टोबर 12 रोजी सुभाष सदाशिव उपरे, सचिन बाळासाहेब उपरे यांचे किरकोळ किराणा दुकान मे. वरद किराणा स्टोअर्स (सर्व रा. भुम. जि. उस्मानाबाद)  यांच्याकडून राजगिरा लाडूचे लेबल असलेला अन्न नमुना तपासणीस घेतला होता.  या व्यावसायिकांकडे साहित्य खरेदीचे बील नसणे, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, पुणे यांनी दिलेल्या   अहवालानुसार संबधित विक्रेत्यांकडील राजगिरा लाडु हा अन्न पदार्थ लेबल दोष असल्याचे म्हटल्याने त्यांनी अन्न सुरक्षा कायदा नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
         राजगिरा लाडुच्या लेबलवरती उत्पादकाचे नाव व उत्पादन केल्याची तारीख, लॉट नंबर व मुदत आदि मजकुर उत्पादकाने नमुद न केल्याने या प्रकरणी श्रीमती मुजावर यांनी पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.याप्रकरणी संबंधितांकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूलही  करण्यात आला.
       याचबरोबर अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. कावळे यांनी किरकोळ विक्रेते, नाश्ताचे हॉटेल, पान टपरी व किरकोळ दुकानदार यासारख्या अन्न व्यावसायिकांच्या दुकानाची  तपासणी केली असता अन्न सुरक्षा कायद्याचे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडुन 21 हजार  रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
 
Top