बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील विधीज्ञ राजश्री डमरे यांची महाराष्‍ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्‍या सेक्रेटरी पद निवड करण्‍यात आली आहे. यावेळी तालुकाध्‍यक्ष सौ. आवारे, शहराध्‍यक्ष रुपाली ढगे, नगरसेविका सीता पवार, सुनिता डमरे, राजश्री ढगे, अनुसया जाधव, नाजमीन शेख, निलोफर पठाण, मेहरुन शेख, सुमन फारुख, जयश्री वाघ आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्‍या.
    राजश्री डमरे यांच्‍या निवडीबद्दल माजी आमदार राजाभाऊ राऊत, युवक तालुकाध्‍यक्ष काका काटे, जिल्‍हा सरचिटणीस श्रीधर कांबळे, विश्‍वास बारबोले, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अरुणदादा बारबोले, शहराध्‍यक्ष काका फुरडे आदीनी डमरे यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top