वैजिनाथ घोंगडे
सांगोला (राजेंद्र यादव) : ‘माण नदीच्या पायी प्रवासातील शोध आणि बोध’ या विषयावर वैजिनाथ घोंगडे यांनी लिहिलेल्या शोध निबंधास महाराष्ट्र जलसिंचन सहयोग तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.   
    सांगोला तालुक्यातील वाढेगांव येथील पेन्शनर व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यानी सहका-यांसमवेत माण नदीचा 165 कि.मी. चा 15 दिवसाचा पायी प्रवास करुन नदीच्या नैसर्गिकतेवर व अस्तित्वावर होणारे परिणाम याविषयी अहवाल प्रकाशित केला होता. तसेच जत तालुक्यातील जालिहाळ बु. येथे झालेल्या चौदाव्या सिंचन परिषदेत ‘माण नदीच्या पायी प्रवासातील शोध आणि बोध’ या विषयावर शोध निबंध सादर केला होता. तसेच त्या सिंचन परिषदेत स्थायी सिंचन पद्धतीवर माण नदीच्या अस्तित्वासाठीच्या समस्या आणि उपाय या विषयावर विचार व्यक्त केले होते. त्यास अनुसरून महाराष्ट्र सिंचन सहयोग औरंगाबाद यांचे तर्फे कै. लक्ष्मीकांत कोकीळ सिंचन पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून या सिंचन परिषदेत सिंचन सहयोग संस्थेचे संस्थापक डॉ. मा. आ. चितळे, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, उपाध्यक्षद. मा. रेड्डी इ. सह राज्यातले पदाधिकारी, अधिकारी शेतकरी उपस्थित होते.
 
Top