नळदुर्ग -: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्‍हाळ्याच्‍या सुट्टीमध्‍ये महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी श्रमानुभव शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे शिबीर नळदुर्ग येथील रामतीर्थ मंदीर येथे होणार आहे
    श्रमानुभव शिब‍ीरात भाषण कौशल्‍य, व्‍यक्‍तीमत्‍त्‍व विकास, संरक्षणासाठी लाटीकाठी प्रशिक्षण, विविध विषयावर चर्चासत्र, तसेच नळदुर्ग किल्‍ला दर्शन, विविध मैदानी खेळ, स्‍वामी विवेकानंद व आजचा युवक, यासारखे विविध सत्र तीन दिवशीय श्रमानुभव शिबीर विद्यार्थ्‍यांसाठी असणार आहे. दि. 22 एप्रिल रोजी रात्री नळदुर्ग शहर वासियांसाठी पाणी व्‍यवस्‍थापन या विषयावर विशेष मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे.
    दि. 22 ते 24 एप्रिल या रोजी होणा-या श्रमानुभव शिबिरास जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अभाविप जिल्‍हा समितीच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
 
Top