नळदुर्ग : श्रीराम नवमीचे औचित्‍य साधून राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ व जनकल्‍याण समितीच्‍यावतीने नळदुर्ग येथील राम‍तीर्थ येथे गोवंश संवर्धन व संरक्षण चारा छावणीचे शुभारंभ करण्‍यात आले.
    या चारा छावणीचे उदघाटन रामतीर्थ मंदिर ट्रस्‍टचे विष्‍णुदास शर्मा महाराज  व शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. जनकल्‍याण समिती ही शिक्षण, आरोग्‍य, आपत्‍ती निवारण, कृषी, संस्‍कार आदी क्षेत्रात काम करीत असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले. यावेळी शंभर जनावरांच्‍या चारा छावणीची सुरुवात करण्‍यात आली यावेळी शेतकरी पशुपालक उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय संघटक अविनाश कोळी, नितीन कोळी, दत्ता राजमाने, जनकल्याण समितीचे उपाध्यक्ष डॉ. सात्वीक शहा, जिल्हा संघचालक महादेवराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, अर्जुन कदम, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे, तालुका अध्यक्ष विजय शिंगाडे, नळदुर्ग येथील श्री स्‍वामी समर्थ अर्बन बँकेच्‍या चेअरमन सौ. संध्‍या भूमकर, प्रदीप घुगे, गणेश घुगे, बलभीम मुळे आदींची उपस्थिती होती.
 
Top