सोलापूर :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे हे दि. 19 व 20 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे
        शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सिध्देश्वर एक्सप्रेसने रेल्वे स्थानक सोलापूर येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.15 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 8 ते 10 वा. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसोबत चर्चा. (स्थळ -शासकीय विश्रामगृह, सोलापूर) सकाळी 10 वाजता सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या कार्यशाळेस उपस्थिती. (स्थळ - यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, सोलापूर) सकाळी 12 वाजता शाहू शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक (स्थळ - सोनिया कॉलेज, सोलापूर) दुपारी 4 वाजता गृहमंत्री  ना. आर.आर.पाटील यांच्या उपस्थितीत होणा-या चारा वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - वाटंबरे ता. सांगोला). सायंकाळी 5 वाजता सांगोला येथे दै. सांगोला नगरी वृत्तपत्राच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता समता पंधरवडा (अस्पृश्यता तथा जाती निर्मुलन द्विसप्ताह) निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - मौजे नान्नज ता. उ. सोलापूर) सायंकाळी 7.30 वाजता सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यास उपस्थिती (स्थळ - वरिष्ठ प्राथमिक हायस्कुल, अक्कलकोट).
          शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसमवेत चर्चा (स्थळ - शासकीय विश्रामगृह, सोलापूर) सकाळी 10 वाजता शासकीय अधिका-यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा (स्थळ - शासकीय विश्रामगृह, सोलापूर) सायंकाळी सोयीनुसार सोलापूर येथून शासकीय वाहनाने कोल्हापुरकडे प्रयाण करतील.
 
Top