सोलापूर -: सन 2011 च्या राष्ट्रीय जनगणनेच्या दरम्यान जिल्हयातील काही घरांमध्ये इन सॅनिटरी लॅटरीन्स (शौचालय) आढळून आली आहे.
       भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी घेतलेल्या निर्णयानुसार इन-सॅनिटरी लॅटरीन्सचे सॅनिटरी लॅटरीन्समध्ये रुपांतर करुन इन सॅनिटरी लॅटरीन्सचे पुर्णपणे निर्मुलन करणे, अशी कामे करणारे सफाईकामगार व त्यांचे अवलंबित यांचे पर्यायी व्यवसायात पुनर्वसन करणे यासाठी दि.19 फेब्रुवारी 2013 ते दि.29 मे 2013 या कालावधीत सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
 
Top