उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 53 व्या वर्धापन दिनी राष्ट्र ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे सकाळी 8 वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी कळविले आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांच्या हस्ते तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांच्याहस्ते सकाळी 7-10 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
    सर्व नागरिकांनी या ध्वजारोहण समारंभासाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top