सांगोला (राजेंद्र यादव) :- सालाबाद प्रमाणे येथील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा चैत्र शुध्द प्रतिपदा गुरूवार दि.11 एप्रिल ते चैत्र शुध्द नवमी शुक्रवार दि.19 एप्रिल रोजीपर्यंत मोठ्या भक्ती भावपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. उत्सव काळात दररोज पहाटे साडे पाच ते साडे सहा पूजा, साडे सहा ते साडे सात काकडा आरती, नामसाधना मंडळाचा नामजप, 7.30 ते 9.30 अभिषेक, दुपारी 4.30 ते 6 अध्यात्म रामायण ग्रंथ  वाचन, महिला भजनीमंडळाचे भजन व रात्रौ तुलसी रामायण रामकथा संगीत गायन असे कार्यक्रम आहेत.
       महिला मंडळ भजनामध्ये गुरूवार दि.11 एप्रिल रोजी श्रीराम महिला भजनी मंडळ, शुक्रवार दि.12 एप्रिल रोजी जयभवानी महिला भजनी मंडळ, शनिवार दि.13 एप्रिल रोजी दत्त महिला भजनी मंडळ, रविवार दि.14 एप्रिल रोजी यमाई महिला भजनी मंडळ, सोमवार दि.15 एप्रिल रोजी विठ्ठल महिला भजनी मंडळ,मंगळवार दि.16 एप्रिल रोजी साई महिला भजनी मंडळ, बुधवार दि.17 एप्रिल रोजी ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ व समर्थ महिला भजनी मंडळ व गुरूवार दि.18 एप्रिल रोजी सत्यसाई भजन सेवा, सांगोला व शिवणे यांचे भजनाचे कार्यक्रम होतील.
      चालु वर्षी उत्सव काळात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि.12 एप्रिल ते दि.18 एप्रिल दररोज सायं.6.30 8.30 ते सुप्रसिध्द रामकथा गायक ह.भ.प. विजयकुमार खंडागळे, संगेवाडी यांचा श्री तुलसी रामायण ज्ञानकथा यज्ञ सोहळा अर्थात संगीतावर आधारीत रामकथा गायन कार्यक्रम होणार असून त्यांना गायक सुदाम कदम आळंदी, ऑर्गनसाथ विनायक कोळेकर,वेषभूषाकार भारत माने हे सहकार्य करणार असून दररोज सादर केलेल्या कार्यक्रमात शिवपार्वती विवाह, रामजन्म सोहळा, सीता स्वयंवर, रामवनवास, भरत भेट, शबरीभेट, रावण वध व श्रीरामराज्याभिषेक सोहळा हे प्रसंग दररोजच्या कार्यक्रमात सजीव देखाव्यासह सादर केले जाणार आहेत. शुक्रवार दि.19 एप्रिल रोजी श्रीराम नवमीचा मुख्य दिवस असून सकाळी 10 ते 12 प्रा.विलास वांगीकर यांचे जन्मोत्सव किर्तन, दुपारी 12 वा. पुष्पवृष्टी होणार असून सायं.5 ते 8 श्रींच्या पालखीची भव्य शोभा यात्रा निघणार आहे. 
     शनिवार दि.20 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 महाप्रसाद कार्यक्रम होईल. वरील सर्वकार्यक्रम श्रीराम मंदिर, महादेव गल्ली, सांगोला येथे होतील. तरी सांगोले शहरातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी रामजन्मोत्सवा निमित्त होणा-या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन भक्ती सुखाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रा.विलास वांगीकर यांनी केले आहे.
 
Top