नळदुर्ग -: हंगरगा नळ (ता. तुळजापूर) या ठिकाणी लोहसहभागातून हनुमान मंदिराचा जीणोध्‍दार करण्‍यात आला. दि. 25 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्‍त मंदिरात मूर्ती प्रतिष्‍ठापना व कळसारोहण कार्यक्रमासह विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे. याचा लाभ भक्‍तानी घेण्‍याचे आवाहन संयोजक संजय वाघोले, जयशिवा तरुण मंडळ यांनी केले आहे.
    तुळजापूर तालुक्‍यातील हंगरगा नळ येथे हनुमान जयंतीनिमित्‍त आयोजित कार्यक्रमास डॉ. नागभूषण शिवाचार्य महास्वामी (हंगरगा नळ), बसवराज शिवाचार्य महास्वामी (नळदुर्ग), शिवयोगी शिवाचार्य महास्वामी (अणदूर), शिवमूर्ती शिवाचार्य (अचलेर), शिवानंद शिवाचार्य (जळकोट ) व राजशेखर महास्वामी यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. याप्रसंगी  पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
Top