नळदुर्ग -: येथील उत्‍तर दिशेला बोरी नदीच्‍या काठावर वसलेल्‍या अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी शासनाने पर्यटन क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत दीड कोटी रूपये मंजूर केले आहे. उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या विशेष प्रयत्‍नामुळे हा निधी मंजूर झाला असून यातून अंबाबाई मंदिर व परिसराचा विकास करण्‍यात येणार असल्‍याचे नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार व उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी यांनी सांगितले.
    नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिराच्‍या विकास कामासाठी ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या विशेष प्रयत्‍नामुळे दीड कोटी रुपये शासनाने मंजूर केले असून या निधीच्‍या पहिल्‍या हप्‍त्‍याची
    दिवसेंदिवस सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत असून पालकमंत्री  ना. चव्‍हाण यांच्‍या प्रयत्‍नांमुळे नळदुर्ग शहरात तातडीच्‍या पाणीपुरवठ्यासाठी म्‍हणून 25 लाख रुपये यापूर्वी उपलब्‍ध करुन दिले. शहरात विंधन विहीरी घेणे, बोरी धरणात चर खोदणे, दोन नवीन विद्युत पंप बसविण्‍यासाठी जिल्‍हाधिका-यांकडून 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. शहरातील सोहेलखॉं, भीमनगर, व्‍यासनगर, मराठा गल्‍ली, ब्राह्मण गल्‍ली, गवळल गल्‍ली येथील जुन्‍या आडातील गाळ काढण्‍यासाठीच्‍या कामाचे अंदाजे 10 लाख रूपये खर्चाचे प्रस्‍ताव शासनाकडे पाठविण्‍यात आल्‍याचे सांगून येत्‍या काही दिवसात जुन्‍या आडातील गाळ काढण्‍याच्‍या कामास सुरुवात होणार आहे.
    शहरातील साठेनगर, भीमनगर, वडारवाडा या ठिकाणी रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे काम सुरु आहे. सध्‍या तीस घरकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. नगरपालिकेस रमाई आवास योजनेंतर्गत अडीच कोटी रुपयेचा निधी उपलब्‍ध झाला आहे. त्‍यातून प्रत्‍येक लाभार्थ्‍याला घरकुल बांधण्‍यासाठी दीड लाख रुपयेचे धनादेश पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते देण्‍यात येणार आहे. वैशिष्‍टयपूर्ण योजनेतून शहरात पथदिवे बसविण्‍याचे काम पुर्णत्‍वाच्‍या मार्गावर आहे. तेराव्‍या वित्‍त आयोगातून अत्‍यावश्‍यक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होण्‍यासाठी जलवाहिनी टाकण्‍यात आली. या कामासाठी 26 लाख रुपयांचा निधी प्राप्‍त झाला असून जलवाहिनी टाकण्‍याचे काम पूर्ण झाले आहे.
रक्‍कम 20 लाख रुपये नगरपालिकेला मिळाले आहे.  मंदीर परिसर आकर्षक रोषणाई, परिसरात सिमेंट रस्‍ते, संरक्षण भिंत, सभागृह, अंबाबाई घाट दुरूस्‍त करुन भक्‍त व पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. हा निधी मंजूर झाल्‍याने अंबाबाई मंदिराचा  विकास झपाटयाने होणार आहे.
 
Top