सांगोला -: तलाव, बंधारे, नाले यामधील गाळ काढण्यासाठी शेकापक्ष इंधन पुरवेल, असे प्रतिपादन आमदार गणपतराव देशमुख यांनी केले.
      सांगोला येथे फुलेनगरजवळील बंधार्‍याचा गाळ काढण्याचा प्रारंभ गणपतराव देशमुख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
    दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व आगामी काळात बंधारे, नाले व तलावात पाणीसाठी मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी शेकाप पक्षाने पुढाकार घेवून गाळ काढण्याचा प्रारंभ केला असून ज्या शेतकर्‍यांना गाळ न्यायचा आहे अशा शेतकर्‍यांच्या वाहनांना लागणारे इंधन शेकापक्षामार्फत दिले जाईल असे सांगून शिरपूर पॅटर्न सांगोला तालुक्यात राबविला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार नागेश पाटील, माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, युवक नेते चंद्रकांत देशमुख, उपनगराध्यक्षा संजीवनी शिंगाडे, नगरसेवक नवनाथ पवार, मधुकर कांबळे, अरुण बोत्रे, संजय शिंगाडे, नगरसेविका शोभा फुले, निवृत्ती फुले, भारत बनकर, किशोर बनसोडे आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top