सांगोला : दुष्काळी भागातील चारा, पाणी आदी ज्वलंत समस्यावर वाचा फोडून सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम दै. सांगोला नगरी निश्चितपणे करेल असे सांगून तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नांला गती देण्याचे काम दै. सांगोला नगरीने करावे असे प्रतिपादन आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.
        सांगोला येथील पत्रकार सतिश सावंत यांनी नव्याने सुरू केलेल्या दै. सांगोला नगरी च्या प्रथम अंकाच्या प्रकाशन आ. दीपकआबा यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्याप्रसंगी आ. दिपकआबा साळुंखे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयमालाताई गायकवाड, सभापती ताई मिसाळ, जि. प. सदस्या राणीताई दिघे, रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, उपनगराध्यक्ष अरूण बिले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब मस्के, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे, महात्मा फूले समता परिषदेच्या तालुकाध्यक्षा वासंती भंडारे, राष्ट्रवादीचे युवा नेते सतीश काशिद पाटील, प्रफुल्ल कदम, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सखुबाई वाघमारे, नगरसेवक व जेष्ठ पत्रकार अरूण बोत्रे, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्मिता देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष आनंदा माने, माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे, दै. सांगोला नगरीचे संपादक सतिश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी पुढे बोलताना आ.दीपकआबा म्हणाले, वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा आहे. या वर्तमानपत्रातून लेखणीच्या माध्यमातून विविध समस्यावर प्रकाश टाकला जातो. दुष्काळी भागातील शेतीला पाणी, जनावरांना चारा, मजुरांच्या हातांना कामे अशा विविध समस्यांवर सतर्क राहून वाचा फोडण्याचे काम दै. सांगोला नगरीने करावे. सांगोल्याचा कायमचा दुष्काळ पुसून टाकण्याच्या कामात दै. सांगोला नगरीचा वाटा महत्वपूर्ण असेल अशी मला खात्री आहे. वर्तमानपत्र चालविताना अर्थकारणाचा प्रश्न महत्वाचा आहे. मात्र संपादक सतिश सावंत यांचे सर्वांशी सलोख्याचे, सहकार्याचे संबंध असल्याने ते या अर्थकारणाच्या प्रश्नावर निश्चितपणे मात करून दै. सांगोला नगरी ताठ मानेने उभे करून कार्य करत राहतील. अतिशय गरीब कुटुंबातून जिद्द व चिकाटीच्या जोरावर पंकारितेच्या माध्यमातून असाध्य ते साध्य करता येते हे आज प्रकाशित करण्यात आलेल्या दै. सांगला नगरीच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे. दुषकाळाबाबत बोलताना ते म्हणाले, तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून कै. आ. काकासाहेब साळुंखे पाटील यांचया पुण्यतिथीव्या दिवशी म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत सोडून या परिसरातील जनतेची तहाण भागविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तालुक्यात चिघळलेला अस्तरीकरणाचा प्रश्न मिटला असून शाखा क्रमांक 4 व 5 ला लवकरात लवकर पाणी आणले जाईल. त्याचबरोबर उजनीचे दोन टीएमसी पाणी पाईपलाईनद्वारे तालु्नयात आणण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे 70 हजार हे्नटरला पाणी उपलब्ध होवून धरणी हिरवीगार होणार आहे. यासाठी दै. सांगोला नगरीने आपल्या माध्यमातून वाचा फोडावी अशी अपेक्षा आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्य्नत केली.
        याप्रसंगी प्रफूल्ल कदम, जेष्ठ पत्रकार नागेश जोशी, रफिक नदाफ यांनी आपले मनोगत व्य्नत करून दै. सांगोला नगरीस भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास लोकमतचे संपादक राजा माने, उपसंपादक संतोष पवार, आयबीएन लोकमतचे सुनिल उंबरे, एबीपी माझाचे सुनिल दिवाण, साम मराठीचे सचिन कसबे, दूरदर्शनचे अभिजीत उबाळे, टीव्हीनाईनचे रवि लवेकर, नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, माजी नगरसेवक नाथा जाधव, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बिले, आनंद घोंगडे, मनोज उकळे सर, सेवादलचे अध्यक्ष बाबुराव खंदारे, महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष मधुकर माळी, शिवसेना तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, शहराध्यक्ष कमरुद्दीन खतीब, इंजिनइर्स असो. चे अध्यक्ष संतोष भोसले, मेडिकल असो. चे अध्यक्ष डॉ. विजय इंगोले, डॉ. राजेंद्र जानकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सूरज बनसोडे, उद्योगपती सुरेश मिसाळ, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कसबे, पाणी पुरवठा समितीचे मधुकर कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. गजानन भाकरे, सूत्रसंचालन भीमाशंकर पैलवान सर, प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी तर आभार दिलवर वाघमारे यांनी मानले.
 
Top