नळदुर्ग :- शहरातील रोकड्या हनुमान मंदीर, व्‍यंकटेशनगर, शास्‍त्री चौक, आलियाबाद, रामतीर्थ येथील हनुमान मंदिराव व परिसरात हनुमान जयंतीनिमित्‍त विविध धार्मिक कार्यक्रमाने गुरुवार रोजी जयंती मोठ्या उत्‍साहाने साजरी करण्‍यात आली. मंदिरात 'श्री' च्‍या दर्शनासाठी पहाटेपासून भक्‍तांनी मोठी गर्दी केली होती. 
     नळदुर्ग येथील रोकड्या हनुमान मंदिरात पहाटे महाभिषेक करुन आरती करण्‍यात आली. त्‍यानंतर उपस्थित भक्‍तांना रोकड्या हनुमान मित्र मंडळाच्‍यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्‍यात आले. हनुमान जयंती करीता बुधवार रोजी जय्यत तयारी करण्‍यात आली होती. मंडळाचे सुधाकर कनकधर, अनिल फिस्‍के, श्रीशैल मुळे, श्रीशैल हुकीरे, भिमाशंकर बताले, नागनाथ फिस्‍के, सागर मुळे, बबन फिस्‍के, सुरज मुळे, किरण मुळे, भिमाशंकर भोसगे, शैलेश कनकधर, सुनिल फिस्‍के, अमोल मुळे, दिपक मुळे, लखन इंगोले आदींनी हनुमान जयंतीसाठी पुढाकार घेतले.
    नळदुर्ग येथील रामतीर्थ मंदिरात हनुमान जयंतीनिमित्‍त पहाटेपासूनच भक्‍तांची गर्दी उसळली होती. या ठिकाणी अनेक भक्‍तांनी हनुमान चालिसाचे पठण करुन पुजाअर्चा केली. यावेळी विष्‍णूदास शर्मा महाराज, लक्ष्‍मण राठोड, सुरेश नकाते, मनीष हजारे, बाबू राठोड, सुनील कुलकर्णी, बसवराज पाटील, सत्‍यनारायण शेठ (हैद्राबाद), प्रा. सुभाषचंद्र जैन (औरंगाबाद), सुरेश चव्‍हाण, श्रीकांत पोतदार यांच्‍यासह अनेकजण उपस्थित होते.
    शहरातील शास्‍त्री चौक येथे हनुमान मंदिरात जयंतीनिमित्‍त महाभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम उत्‍साहाने साजरा करण्‍यात आले. शिवसेना युवा तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके, प्रभाकर घोडके यांच्‍यावतीने महाप्रसादाचे वाटप यावेळी करण्‍यात आले. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, दत्‍तात्रय वाघमारे, अरुण ठाकूर, बालाजी दस, शाम कनकधर, मल्लिनाथ कांबळे यांच्‍यासह जय हनुमान तरुण मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांनी कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी पुढाकार घेतले. त्‍याचबरोबर हनुमान जयंतीनिमित्‍त शुक्रवार दि. 26 रोजी शास्‍त्री चौक येथे कोराळा (ता. उमरगा) येथील बालाजी महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम रात्री आठ वाजता होणार आहे. यावेळी उपस्थित दिंडीतील वारक-यांना सरदारसिंग ठाकूर यांच्‍यावतीने भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
    नळदुर्ग-तुळजापूर रस्‍त्‍यावरील मानेवाडी पाटीजवळ हनुमान मंदीरात नागरिकांच्‍यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्‍यात आले.
 
Top