उस्मानाबाद :- जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. चौथ्या सोमवारी सकाळी 11 वाजता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
       अर्जाचा नमुना संबंधित तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित तहसील कार्यालय येथे उपलब्ध असून महिलांनी विहित नमुन्यात दोन प्रतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे,विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवाविषयक व आस्थापना विषयक बाबी आणि तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 
Top