नळदुर्ग -: भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्‍त नळदुर्ग येथे दि. 14 ते दि. 28 एप्रिल या कालावधीत भरगच्‍च कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून रांगोळी, भाषण, सुंदर हस्‍ताक्षर, संगीत खुर्ची व चित्रकला या स्‍पर्धाबरोबरच विविध गुणदर्शन, भीमगीत यासह इतर अनेक कार्यक्रमाचा समावेश आहे.
    रविवार रोजी सकाळी साडे आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या प्रतिमेचे पूजन करुन झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर भीमनगर ते किल्‍लागेट व किल्‍लागेट ते बसस्‍थानक अशी भव्‍य रॅली काढण्‍यात येणार आहे. तसेच दि. 20 एप्रिल रोजी रांगोळी स्‍पर्धा, दि. 22 एप्रिल रोजी भाषण स्‍पर्धा, दि. 23 रोजी सुंदर हस्‍ताक्षर स्‍पर्धा, दि. 24 रोजी संगीत खुर्ची व चित्रकला स्‍पर्धा, दि. 25 रोजी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, दि. 27 रोजी भीम गीतांचा कार्यक्रम होईल. रविवार दि. 28 एप्रिल रोजी नळदुर्ग शहरातून मुख्‍य चौकासह विविध प्रमुख मार्गाने डॉ. आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची भव्‍य मिरवणुक काढण्‍यात येणार आहे. वरील कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्‍याचे आवाहन संयोजकानी केले आहे.
 
Top