उस्मानाबाद -: भारतीय राज्य्‍घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122 व्या जयंती निमित्त राज्याचे पशुसवंर्धन व मस्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
       यावेळी त्यांच्यासमेवत खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, नगराध्यक्षा सरस्वती घोणे, तुळजापूर विकास प्राधिकारणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जनता बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, विश्वास शिंदे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल.हरिदास, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, समाजकल्याण सभापती दगडू धावारे, अदिंची  उपस्थिती होती.
     पालकमंत्री चव्हाण शुभेच्छा देताना म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहून सर्वांना समान अधिकार दिला आहे. त्यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू. त्यांच्या उत्सावाबरोबरच विचाराचे उत्सव साजरे करावेत,असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. जि.प.अध्यक्ष डॉ. व्हट्टे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्व सामान्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांच्या मुल्याचा अंगिकार करावा, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
        यावेळी  यशपाल सरवदे, राजाभाऊ ओव्हळ, लक्ष्मण सरडे, सिध्दार्थ बनसोडे, मधुकर तावडे, राजपाल गायकवाड, नितीन बागल, धनंजय शिंगाडे, बाळासाहेब शिंदे, विशाल शिंगाडे, अशोक चिलवंत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी खुशाल गायकवाड यांच्यासह पदाधिकारी  व मोठया प्रमाणात धम्म बांधव उपस्थित होते.
     अशोक चिलवंत यांनी पालकमंत्री चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे यांना अशोक स्तंभाची प्रतिकृती देऊन स्वागत केले..नामेदव ओव्हळ यांनी  शपथेचे वाचन करुन धम्म वंदना दिली. 
 
Top