बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील सुप्रसिध्‍द कॅन्‍सर तज्ञ व शल्‍यचिकित्‍सक डॉ. मनोज लोखंडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील केलेल्‍या उल्‍लेखनीय कार्याबद्दल परिवर्तन बहुउद्देशीय शिक्षण संस्‍था, शिंगोली ता.जि. उस्‍मानाबाद यांच्‍यावतीने डॉ. द्वारकास कोटणीस जीवन गौरव परस्‍कार जाहीर करण्‍यात आला आहे.
      उस्‍मानाबाद येथील मेघमल्‍हार फंक्‍शन हॉल येथे शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता या पुरस्‍काराचे वितरण केले जाणार आहे. त्‍याचबरोबर भारतातील पहिल्‍या महिला विमान चालक सुरेखा यादव व राज्‍यातील आदर्श महिला सरपंच साराबाई राम पवार यांना माता जिजाऊ पुरस्‍कार, तसेच प्रभारक पणशीकर यांना राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्‍कार, रविंद्र केसकर यांना डॉ. बाबसाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुस्‍काराने गौरविण्‍यात येणार आहे.
    या कार्यक्रमामध्‍ये डॉ. शकिल शेख, विभागीय उपसंचालक रमेश भांडवलकर, सोलापूर महानगरपालिकेचे वरिष्‍ठ अभियंता पा.पु. अशोक कांबळे, प्रा. राम इवरे, डॉ. आंबेर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पुरस्‍कारासाठी स्‍मृतीचिन्‍ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देवून गौरविण्‍यात येणार आहे. विविध क्षेत्रातील उल्‍लेखनीय कार्याबद्दल पुरस्‍कार देऊन गौरविण्‍याचे संस्‍थेचे हे दुसरे वर्ष आहे.
    डॉ. मनोज लोखंडे हे कॅन्‍सरचे तज्ञ व शल्‍यचिकित्‍सक असनू मागील बारा वर्षापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. बार्शीतील कॅन्‍सर हॉस्पिटलमध्‍ये मागील तीन वर्षापासून सेवेत आहेत व त्‍यांनी आपल्‍या क्षेत्रातील मिळविलेल्‍या नावलौकिकाममुळे त्‍यांचे नाव झाले आहे. त्‍यांच्‍या कार्याची रूग्‍ण व विविध स्‍तरातून सखोल चौकशी करुन त्‍यांच्‍या नावाची घोषण करण्‍यात आली आहे. अत्‍यंत कमी वयात त्‍यांना मिळालेल्‍या जीवनगौरव पुरस्‍कारामुळे त्‍यांच्‍या सामाजिक कार्याची पावती त्‍यांना मिळाली आहे.
 
Top