उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत जिल्हयात थेट शेतीमाल विक्रीची योजना राबविण्यात येत आहे. ही  योजना शेतक-यांच्या विविध शेतीमाल पिकवणा-या गटांमार्फत राबविण्यात येणार  असून या योजनेमुळे शेतकरी व व्यापारी या मधील व्यापारी साखळी दूर होऊन याचा फायदा थेट शेतमाल उत्पादक शेतक-यांना होणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी  पुढे यावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प व्ही.बी. लोखंडे  यांनी केले आहे.
       थेट शेतीमाल विक्री व्यवस्थापन करण्याबाबत शेतमाल उत्पादक शेतक-यांच्या गटास तालुका कृषि अधिकारी स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शकाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरुन शेतकरी गटांना विक्री व्यवस्थापन करणे सुलभ होईल. या योजनेत शेतकरी गट व गृहनिर्माण संस्था यांची सांगड घालण्यात येणार असून शहरांमधील गृहनिर्माण संस्थामध्ये शेतमाल विक्रीसाठी तात्‍पुरत्या स्वरुपाच्या जागेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
     तरी जिल्हयातील सर्व शेतमाल उत्पादक शेतकरी गटांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद, प्रकल्प संचालक, आत्मा, उस्मानाबाद,संबंधित तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी आणि महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे कृषी पणन तज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषि, पणन, सहकार विभाग आणि आत्मा यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
          अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्राशेजारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर,कापरे टावर्स,दुसरा मजला,उस्मानाबाद (दुरध्वनी क्रं. 02472-222073, कृषी पणनतज्ज्ञ-मो.क्र. 9404677005 ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top