सौ. प्रतिभा सपाटे
सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नगराध्यक्षपदासाठी सौ. प्रतिभा मनोज सपाटे यांच्या नावावर एकमत झाले आहे. 
     कॉंग्रेस पक्षाच्यावतीने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींची बैठक रविवारी दुपारी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीत माजी आमदार अँड. शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, माजी नगराध्यक्ष तथा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रफिक नदाफ यांनी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची मते व्यक्तिश: जाणून घेतली. 
      त्यानंतर सौ. प्रतिभा मनोज सपाटे यांचे नाव ऍड. शहाजीबापू पाटील यांनी जाहीर केले. मणेरींनाही संधी -कॉंग्रेस पक्षाचे दुसरे इच्छुक असलेले नगरसेवक इमाम मणेरी यांनाही नगराध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे नदाफ यांनी सांगितले. पहिल्यांदा सपाटे यांना व नंतर मणेरी यांना हे पद दिले जाणार असल्याने मणेरींच्याही गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार हे आता नक्की झाले आहे. 16 एप्रिल 2013 रोजी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करावयाचे असून त्याच दिवशी अर्जांची छाननी होणार आहे. 17 रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असून आवश्यकता भासल्यास 20 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. शासनाचा हा कार्यक्रम असला तरी आतादोघांनाही संधी देण्याचे ठरल्यामुळे सौ. प्रतिभा सपाटे यांची निवड बिनविरोध होणार हे नक्की आहे.
 
Top