उस्मानाबाद -: ग्राहकांना विज बिलाचे वाटप न करता, विजेचे कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयासमोर विज बिलाची होळी करून, तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
    शहरातील आनंदनगर, रामनगर, काकडे प्लॉट भागातील विज ग्राहकांना गेल्या दोन महिन्यापासून विजेचे वाटप झालेले नाही. ज्या संस्थेला विज बिल वाटपाचे टेंडर देण्यात आले होते,त्या सस्थेकडे मणुष्यबळ नसल्यामुळे विज बिले कार्यालयातच पडून रहात होती. सोमवारी काही ग्राहक रामनगरमधील महावितरणच्या कार्यालयात गेले असता,दीड हजार बिलाचा गठ्ठा दिसून आला.
      त्यानंतर संतप्त झालेले अनेक विज ग्राहक तसेच काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने,हरीभाऊ शेळके, मिलिंद गोवर्धन,सुरेश जगताप यांनी उपकार्यकारी अभियंता एस.के.पवार यांच्या कार्यालयात गेले आणि त्याचा जाब विचारला.यावेळी पवार यांनी विज बिल वाटपाप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली तसेच नविन व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
      यावेळी उपस्थित ग्राहकांनी महावितरण कार्यालयाबात अनेक तक्रारी केल्या.अंदाजे बिल देणे, विज बिलाचे वाटप न करणे, विजेच्या तक्रारी संदर्भात फोन केल्यानंतर फोन न उचलणे आदी तक्रारी करण्यात आल्या.त्यानंतर त्याचा निषेध म्हणून, कार्यालयासमोर बिज बिलाची होळी करण्यात आली.
 
Top