सांगोला (राजेंद्र यादव):- फेब्रुवारी 2013 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील नऊ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
       यामध्ये इयत्‍ता पाचवीतील भाग्यश्री आप्पासाहेब पवार व निलेश नेताजी पवार (केंद्रात प्रथम व राज्यात पंधरावा), उत्कर्षा वसंत फुले (केंद्रात द्वितीय), प्रांजली पांडुरंग जाधव (केंद्रात द्वितीय), प्रशांत महादेव सोनलकर (केंद्रात तृतीय), सोहम भगवान कुलकर्णी (केंद्रात तृतीय), इयत्‍ता सातवीतील ऋषिकेश मारूती काळेबाग (केंदात द्वितीय व राज्यात तृतीय) तसेच इयत्‍ता आठवीतील रोहीत राजकुमार पाटील (केंद्रात व जिल्ह्यात प्रथम व राज्यात तृतीय) प्रणाली हरीबा घोडके (केंद्रात व सहा जिल्ह्यात द्वितीय) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
       विद्यार्थ्यांना वैभव कोठावळे, अमोल रणदिवे, विभागप्रमुख शिवाजी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, सचिव चंद्रशेखर अंकलगी, प्राचार्य बजरंग लिगाडे, उपमुख्याध्यापक राजेंद्र विठ्ठलदास, उपप्राचार्य सौ.छाया यादव, पर्यवेक्षक नारायण विसापुरे, आय्युब मन्यार, बबन बुंजकर,प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-र्यांनी केले आहे.
 
Top