आ. दिपकबाबा साळुंखे-पाटील
सांगोला (राजेंद्र यादव) -: सोलापूर जिल्ह्यात राजीवगांधी आरोग्य विमा योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केल्यानंतर या योजनेअंतर्गत एकूण 800 आजारांवर शासनाच्या वतीने उपचार सुरु असून सोलापूर जिल्ह्यात ही योजना सुरु झाल्यापासून 5650 रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केली असून यापुढे ही योजना चांगल्या प्रकारे राबवून दारिद्रय रेषेखालील व 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न फायदा होणार होता. पंरतू 972 आजारांसाठी ही योजन राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. 
            आ. दीपकआबा साळुंखे-पाटीलयांनी विधानपरिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नात विचारल्यानंतर ही योजना सुरु झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यात 2012 पासून आत्तापर्यंत 5650 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार या योजने अंतर्गत करण्यात आले. 800 आजारावर उपचार करुन उपचारासाठी रुग्णांना हॉस्पीटलमध्ये पोहचविणे ही जबाबदारी विमा असणार्‍या रुग्णांना मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री ना. सुरेश शेट्टीयांनी लेखी आश्वासन उत्तरात दिले. राज्य शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी मोफत उपचार व्हावेत यासाठी राजीव गांधी आरोग् विमा दि. 2 जुलै 2012पासून योजना सुरु केली होती त्यामध्ये दारिद्रय रेषेखालील व एक लाखाच्या आतील उत्पन्न असणार्‍या सर्व नागरीकांना राजीव गांधी आरोग्य विमा योजनेचा कंपनीने दिलेल्या रकमेत करणे आवश्यक असूनही राजीव गांधी आरोग्य विमा योजना चांगल्याप्रकारे राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री ना. सुरेश शेट्टी यांनी आश्वासन लेखी उत्तरात दिले.
 
Top