उस्मानाबाद :- लेखा व कोषागारे विभागाच्या मराठवाडा विभागाचे वेतनपडताळणी पथक दि. 8 ते 10 मार्च या कालावधीत उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या दौ-यात हे पथक सेवापुस्तकांची  पडताळणी करणार आहे.
         दि. 8 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, सहाय्यक आयक्त पशुसंवर्धन, प्राचार्य, व्यवसाय व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा व तालुकास्तरावरील इतर कार्यालयातील कर्मचा-यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यात येणार आहे. सेवापुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवानिवृत्त होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत.
    तसेच सेवा पुस्तक पडताळणी  पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोषमधील वेतनिका प्रमाणित DDO Login करावे. DDO Login  करण्यासाठी BDS साठी वापरण्यात येत असलेल्या User and Password वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक पडताळणीसाठी सादर करावयाची आहे, त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे म्हणून लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथकाच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार करुन त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी पथकाकडे सादर करावीत, असे आवाहन सहसंचालक, लेखा  व कोषागारे, औरंगाबाद विभाग यांनी केले आहे.
    जिल्हयातील संबंधित आस्थापनांनी आपापल्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणी करुन घ्यावीत,असे आवाहन जिल्हा  कोषागार अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top