नळदुर्ग -: खुदावाडी (ता. तुळजापूर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमितीचा उल्लेखनीय कार्याबद्दल नुकतेच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शेटकर यांच्या हस्ते पाच लाख रूपयेचा धनादेश देवून गौरवण्यात आले आहे.
    सन २०११-१२ या वर्षात उल्लेखनीय कार्य केलेल्या तंटामुक्त ग्रामसमित्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पारितोषिक जाहीर केली होती. त्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरीय पारितोषिक मिळवलेल्या खुदावाडी महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमितीमध्येही पाच लाखाचे पारितोषिक मिळवले आहे. यामुळे खुदावाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
    खुदावाडी तंटामुक्तीकडे जवळपास सत्तर प्रकरणे आली होती. यामध्ये महिलांवरील अत्याचार, भांडणे, मारामा-या, रस्ते, बांधाची प्रकरणे, घरगुती अशा प्रकरणांचा समावेश होता. तंटामुक्त ग्रामसमितीचे अध्यक्ष शरण्णाप्पा कबाडे यांनी यासाठी आठवड्यातून रविवारी तंटामुक्तीसाठी बैठक ठेवली होती. आठवड्यातून एक दिवस तंटामुक्तीच्या कार्यालयात गावातील प्रतिष्ठितांच्या मदतीने दिवाणी प्रकरणातील दोन प्रकरणे वगळली तरी बाकी सर्व प्रकरणे या तंटामुक्त समितीच्या कार्यालयात स्थानिक ठिकाणीच मिटली आहेत.
    तंटामुक्तीचे काम पाहून पुरस्कारासाठी नळदुर्ग पोलिस स्टेशनमध्ये पारितोषिकांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. व या पाच लाखाच्या बक्षिसाचे शासकीय निकषानुसार ग्रामविकासासाठी खर्च करणारे असल्याचे ही कबाडे यांनी सांगितले. पारितोषिक वितरणप्रसंगी सरपंच रेवण स्वामी, उपसरपंच शिवाप्पा जवळगे यांसह मान्यवर उपस्थित होते.
 
Top