नळदुर्ग -: श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना शेतक-यांच्या हितासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी हा कारखाना व डिस्टीलरी प्रकल्प चालविण्यासाठी 18 ते 20 वर्ष दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला. दरम्यान तरुण उद्योजकांनी हा कारखाना चालविण्यास पुढे यावे, त्यास सर्वत्तोपरी सहकार्य करण्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी यावेळी दिली.
      नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकार साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर चेअरमन नरेंद्र बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्‍यासपीठावर राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, व्‍हा.चेअरमन सुनीलराव चव्‍हाण, संचालक गोकुळ शिंदे, अमर मगर, नेताजी पाटील, महादेवप्पा आलुरे, प्रकाश चौगुले, शहबाज काझी, लक्ष्मण वाघमारे, दिगंबर खराडे, राजशेखर वडणे, अशोक पाटील, वनमाला डोंगरे, करुणा पेंदे, कार्यकारी संचालक विकास भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री तुळजाभवानी साखर कारखान्याच्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण म्‍हणाले की, जिल्हयातील दोन कारखाने आणि एक जिल्हा बॅंक हे ख-या अर्थाने शेतक-यांची दौलत असून या सहकारी संस्था टिकल्या पाहिजे, त्‍याकरीता आपण प्रयत्‍नशील असून तुळजाभवानी कारखाना भाडेतत्वावर चालविण्याठी दृष्टी शुगरला देण्यात आला होता. मात्र त्यांना कोण पळवून लावले आहे. आता हे तुम्हीच ठरवा असे सांगून हा कारखाना जिल्हा बॅंकेचे सुमारे 93 कोटी रुपये देणे आहे. अशा परिस्थीतीत हा कारखाना कसा चालवयाचा हा यक्ष प्रश्न आहे. पण आता संचालक मंडळाने आणि सभासदांनी हा कारखाना वाचविण्यासाठी पुढे काय करायचे, हे ठरवावे पण कारखाना वाचविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. शेतक-याच्या हितासाठी उभी केलेली ही संस्था मी मोडकळीस येवू देणार नाही, असा ठाम निश्‍चय त्‍यांनी सांगितले.
     यावेळी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी म्हणाले की, कारखाना बंद असल्यामुळे शेतक-यासमोर ब-याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा कारखाना बंद आसल्यामुळे अनेकांकडून कारखाना विक्री करण्याचा प्रस्तावपुढे येत आहे. पण शेतक-याच्या आणि कामगारांच्या हितासाठी हा कारखाना उभा केला आहे आणि तो आम्ही कसल्याही परिस्थीतीमध्ये विकला जावू देणार नाही. तर चेअरमन नरेंद्र बोरगावकर म्हणाले की, जिल्हा बॅंकेशी तडजोड करुन हा कारखाना चालवावे, याकरीता प्रयत्न होत असून हा कारखाना मोठया दीर्घ काळासाठी भाडेतत्वावर चालविण्यास देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर आला आहे, असे सांगून हा कारखाना भाडेतत्‍त्‍वावर चालविण्‍यास देण्‍याशिवाय पर्याय नाही, हा कारखाना चालू करण्यासाठी आमचा प्रयत्न होत आहे.
     यावेळी आयोजित सभेत, वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतीवृत्‍त वाचून कायम करणे, 97व्‍या राज्‍यघटना दुरूस्‍तीच्‍या अनुषंगाने सहकारी संस्‍था अधिनियम 1960 नुसार संस्‍थेचे आदर्श उपविधी 2013 स्विकारणेस मंजुरी देणे, सन 2012-13 चा सहकारी वर्षासाठी वैधानिक लेखा परीक्षकांचे नेमणूक करणे, सन 2010-11 व 2011-12 या वर्षातील संस्‍थेच्‍या कामकाजाचा संचालक मंडळाने सादर केलेला 28 वा व 29 वा अहवाल स्विकारणे व त्‍याची नोंद घेणे, कारखान्‍याचे मागील वर्षाचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक स्विकारणे व त्‍याची नोंद घेणे, सन 2012-13 या वर्षाकरीता संचालक मंडळाने सादर केलेल्‍या महसुली व भांडवली खर्चाच्‍या अंदाजपत्रकास मान्‍यता देणे, संचालक मंडळानी कारखाना डिस्‍टीलरी शासकीय नियमाप्रमाणे 18 ते 20 वर्ष या दीर्घ मुदतीकरीता भाडेतत्‍त्‍वावर देणे, यासह नऊ विषयावर चर्चा करण्‍या आली.
      सभेचे अहवाल वाचन प्रभार कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी चव्हाण तर आभार गोकुळ शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास पं.स. उपसभापती प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, हरिष जाधव यांच्‍यासह ऊसउत्पादक शेतकरी, सभासद, कामगार, मान्‍यवर नागरीक उपस्थित होते.
 
Top