उस्मानाबाद -: ऑक्टोबर ते डिसेंबर-2013 या कालावधीत मुदती संपणा-या ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील येळी (ता.उमरगा) आणि खासगाव (ता.परंडा) या ग्रामपंचायतींच्या मुदती उपरोक्त कालावधीत संपणार असल्याने संबंधित तहसीलदारांनी या ग्रामपंचायतींच्या  प्रभाग रचना व आरक्षणाबाबतची कार्यवाही  करावी तसेच प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करुन 4 मे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिले आहेत.
    प्रारुप प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी यांची मंजूरी आवश्यक असल्याने विहित मुदतीत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    राज्य निवडणूक आयोगाने उपरोक्त कालावधीत मुदती संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
    प्रारुप प्रभाग रचनेला प्रधिकृत अधिका-यांने मान्यता देणे -6 मे,2013, आरक्षणासाठी सोडत पध्दतीने प्रभागाचे आरक्षण ठरविणे-13 मे, हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिध्द करणे-16 मे, हरकती सादर करण्याची अंतिम तारीख-24 मे, मागविलेल्या ज्या हरकती व सूचना प्राप्त झाल्या त्यावर निर्णय घ्यावयाचा अंतिम दिनांक -31 मे आणि अंतिम प्रभाग आरक्षित जागा वगैरेचा तपशील प्रसिध्द करणे-5 जून,2013.
 
Top