उस्‍मानाबाद :- तेर (ता. उस्‍मानाबाद) येथील श्री संत गोरोबा काका यांचा वार्षिक महोत्‍सव सर्वांनी एकत्रित मिळून चांगल्‍याप्रकारे साजरा करण्‍याचे आवाहन जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ. अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.
    उस्‍मानाबाद तालुक्‍यातील तेर येथील संत गोरोबा काका मंदिरात यात्रेसंदर्भात आयोजित बैठकीत जि.प. सदस्‍या सौ. अर्चनाताई पाटील ह्या बोलत होत्‍या. बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी तेरचे उपसरपंच दीपक नाईकवाडी हे होते. याप्रसंगी ढोकी पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे, तेरच्‍या ग्रामीण रूग्‍णालयाचे डॉ. मुकूंद माने,  जागजी प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे डॉ. पापडे, विद्युत मंडळाचे कनिष्‍ठ अभियंता रजपूत, महसूल विभागाचे मंडलाधिकारी समुद्रे, एसटी महामंडळाचे राजाभाऊ आंधळे, यांनी यात्रेसंदर्भात केलेल्‍या उपाययोजनेची माहिती सांगितली.
    यावेळी विद्युत महामंडळाचे सहाय्यक अभियंता नेरुळकर, तेरचे तलाठी कोळी, सुमेध वाघमारे, भगीरथ तापडे, भूषण भक्‍ते, भास्‍कर माळी, विनय कांबळे, विशेष शाखेचे बिदे, मजीद मनियार व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरहरी बडवे यांनी केले.
 
Top