बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: गॅस सिलेंडर व शासनाच्‍या स्‍वस्‍त धान्‍य दुकानाच्‍या योजनेतील अनुदान मिळाले असून त्‍याकरीता 15 हजार 300 रुपयांचे चलन भरावे, असे सांगून फसवणूक केल्‍याने बार्शी शहरात खळबळ उडाली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, अनोळखी चार इसमांनी निनायक श्रीनिवास कुलकर्णी (वय 63, रा. सावरगाव, ता. भूम, सध्‍या रा. देशमुख प्‍लॉट, बार्शी) यांना आपल्‍या नावाने 1 लाख 40 हजारांचे अनुदान आल्‍याचे सांगत त्‍याकरीता 15 हजार 300 रुपयांचे स्‍टेट बँकेत चलन भरावे लागेल, असा विश्‍वास देत फसवणूक केली. कुलकर्णी यांनी त्‍यांच्‍याकडून सांगितलेल्‍या माहितीवर विश्‍वास ठेवून शनिवारी सकाळी साडेदहाच्‍या सुमारास अँक्सिस बँकेतील एटीएम मधून रक्‍कम अज्ञात इसमांच्‍या हवाली केली. सादरच्‍या घटनेनंतर आपली फसगत झाल्‍याचे लक्षात येताच त्‍यांनी बार्शी पोलिसांना खबर दिली. या प्रकारच्‍या घटनेवरुन इरत नागरिकांची फसगत होवू नये, म्‍हणून तसेच वरील प्रकारातील गुन्‍हेगारांची माहिती बार्शी पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बार्शी पोलिसांकडून करण्‍यात आले आहे.
 
Top