सोलापूर -: ग्रामीण भागातील पत्रकारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजाची माहिती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद व झेडपी पत्रकार संघातर्फे शुक्रावार दि. 19 एप्रिल रोजी ग्रामीण पत्रकारांसाठी कार्याशाळा आयोजिल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
        शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या वेळी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, कृषी सभापती जालिंदर लांडे, पक्षनेते मकरंद निंबाळकर, विरोधी पक्षनेते संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आदी उपस्थित राहणार आहेत. पत्रकारितेची आचारसंहिता या विषयावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे ग्रामीण प्रश्नांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडत आहेत का? या विषयावर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे, बदलेल्या काळात ग्रामीण पत्रकारांची भूमिका या विषयी ज्येष्ठ पत्रकार राजा माने, पंचायतराज हेतू आणि कार्यपद्धती या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, जिल्हा परिषदेच्या योजनांमध्ये माध्यमांची भूमिका या विषयी विभागीय उपायुक्त इंद्रजित देश्मुख हे मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांनी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विजय देशपांडे (9764756696) यांच्याशी संपर्क साधावा.

 
Top