बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्‍त प्रत्‍येक वर्षी होणा-या मिरवणुका व अवाजवी खर्चाला फाटा देत बार्शीमधील राऊत चाळ येथील राज-विजय संचलित गौतम बुध्‍द मागासवर्गीय संस्‍थेने अरणगाव येथील ग्रामस्‍थांसाठी पाण्‍याची बोअर (विंधनविहीर) घेतली आहे.
    सध्‍याच्‍या दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर अन्‍नधान्‍यांची टंचाई नसली तरी जनावरांच्‍या व माणसांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर युवकांनी एकत्र येऊन सामाजिक कार्याला प्राधान्‍य देत पाण्‍यासाठी विंधनविहीर घेतले आहे. यावेळी मंडळाचे आधारस्‍तंभ माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्‍या हस्‍ते श्रीफळ वाढवून विंधनविहीर घेण्‍यास सुरुवात झाली.
    येथील भिम नगर, राऊत चाळ, सोलापूर रोड, सुभाष नगर आदी भागातील आंबेडकर जयंती उत्‍सवाच्‍या कार्यक्रमात प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केल्‍यानंतर राजेंद्र राऊत यांनी अरणगाव येथील विंधनविहीरचा शुभारंभ केला. यावेळी नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते अरुण बारबोले, पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, दिपक ढावारे, पिनू काकडे, मिलींद ताकपिरे, संतोष भोसले, शांतीलाल कदम, सरपंच बापू लांडगे, महादेव ढवळे, पिंटू यादव, बापू पाटील, रणजित चांदणे, गौतम वाघमारे, प्रविण रिकीबे, सागर लंकेश्‍वर, बळी ओव्‍हाळ, सुरज नागटिळक, किरण काकडे, दादा भोसले यांसह ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top