उस्मानाबाद :- पारधी समाजासाठी घरकुल योजना मंजूरीची बैठक अपर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि. 25 एप्रिल  रोजी दुपारी 2 वाजता त्यांच्या  दालनात आयोजित करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांची निवड ही चिठठीद्वारे करण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
       जिल्हयातील उस्मानाबाद, तुळजापूर, भुम, कळंब, वाशी व परंडा या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या पारधी समाजाचे लोकांना घरकुल मंजुर करण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची समितीद्वारे छाननी करुन पात्र व अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या संबधित तहसिल कार्यालय तथा पंचायत समिती कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यांत आलेल्या आहेत. तरी पात्र लाभार्थ्यांनी या बैठकीच्यावेळी  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या  कार्यालयात वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top