सोलापूर :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील भुमिहीन शेतमजुरांना बागायत 2 एकर व जिराईत 4 जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी खाजगी व्यक्तींमार्फत जमीन खरेदी करुन संबंधितांना देण्यात येणार आहे. तरी जमीन विक्री करण्यास तयार असणा-या व्यक्तींनी पुढील अटींची पूर्तता करावी.
    जमिनीवर इतर कोणाचाही मालकी हक्क नसावा, सदर जमिनीवर कोणत्याही आर्थिक संस्थेचा बोजा किंवा संस्थेला तारण नसावी, सर्च रिपोर्ट सादर करावा, जमिन करण्यासारखी असावी, 7/12 उता-यावर व खाते उता-यावर विक्री करणा-योचे नांव असावे, इतर क्यक्तींच्या नांवे मुखत्यारपत्र नसावे, शासन दराने खरेदीबाबत कायदेशीर संमतीपत्र द्यावे लागेल, स्टॅम्प ड्युटी बाबत निर्णय नंतर घेण्यात येईल, जमिन न्यायप्रविष्ठ नसलेबाबत संबंधित मालकाचे संमतीपत्र, सदरची जमिन शासनाकडून मोफात मिळाली नसलेबाबत जमिन मालकाचे संमतीपत्र.
    तरी जमिन विक्री करणा-या व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सात रस्ता, सोलापूर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांनी केले आहे.
 
Top