उस्मानाबाद :- सप्टेंबर/ऑक्टोबर मध्ये राजय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे औरंगाबाद व लातूर विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  (इ. 12 वी)  परीक्षेस पुनर्परीक्षार्थी ,नाव नेांदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार येाजनेअंर्तत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारेखत कांही तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात आला आहे.
          विद्यार्थ्यांनी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने विहीत शुल्कासह आवेदनपत्रे सादर करण्याचा तारीख बुधवार, दि. 31 जुलैपर्यंत असून विलंब शुल्कासह  6 ऑगस्ट ही आहे, दि. 3 ऑगस्टपर्यंत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा शुल्क भरणे व चलनाची माहिती अपलोड करणे अपेक्षित असून  विलंब परिक्षा शुल्क भरणे व अपलोड करणे यासाठी दि. 7 ते   10 ऑगस्ट ही मुदत आहे.
          विद्यार्थ्यांनी  आवेदनपत्र भरण्यासाठी संबंधित शाळा/ महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधावा.  सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुनही ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत, असे मंडळाच्या सचिवांनी  पत्रकाव्दारे कळविले आहे.
 
Top