उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दि. 17 एप्रिल रोजी होणार असून सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, प्रशासकीय नियंत्रणाखालील मंडळे, महामंडळे बंद राहतील. या आस्थापनांतील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    याशिवाय, जिल्हयातील दुकाने, आस्थापना,  निवासी, हॉटेल, खादयगृह, अन्नगृहे, नाटयगृहे, व्‍यापार, औदयोगिक उपक्रम किंवा इतर आस्‍थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदि आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानांच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी देण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.  सदर सुटीसाठी  कोणतीही वजाती किंवा कपात करता येणार नाहीत. सर्व आस्थापनांनी याची काटेकोरपणे नोंद घ्यावी, असे आवाहनही सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे. 
 
Top