उस्मानाबाद - : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या समर्थकाने मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
    समाजेसवक आण्णा हजारे यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याविरूध्द पत्रक काढून जनजागृती करत होते. .त्यामुळे चवाळलेल्या डॉ.पाटील यांच्या एका समर्थकाने आण्णा हजारे यांच्‍या राळेगणसिध्‍दी येथील कार्यालयात दि.९ आणि १४ एप्रिल रोजी फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
    डॉ.पाटील यांच्याविरूध्दची मोहीम थांबवा नाही तर परिणाम वाईट होतील तसेच निवडणुकीत डॉ.पाटील यांचा पराभव झाल्यास बघून घेण्यात येईल,असेही धमकी देणा-यांनी म्हटले आहे.ऐवढेच नाही तर आण्णांना एकेरी भाषेत बोलून शिवीगाळही करण्यात आली आहे.
    याप्रकरणी आण्णा हजारे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या फिर्यादीची एक प्रत उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांनाही देण्यात आली आहे.
 
Top