उस्मानाबाद -: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मैदानी, खो-खो, व कुस्ती खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर दि.25 एप्रिल ते 4 मे,2014 या कालावधीत सकाळी 6-30 ते 8-30 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे.
     विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता दरवर्षी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षण शिबीराकरिता तज्ञ व अनुभवी शासकीय राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्यन जाधव-खो-खो, श्री.गणेश पवार-मैदानी, संदीप वांजळे- कुस्ती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सुर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार, योगासने, प्राणायम, अॅरोबीक्स, मनोरंजनात्मक खेळ व व्यक्तीमत्व विकास या बाबीवर विशेष भर दिला जाणार आहे. 
       या शिबीरात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. तरी उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे नोंदवावी. संपर्कासाठी  भ्रमणध्वनी क्रमांक- मुख्य क्रीडा मार्गदर्शक श्री. सत्येन जाधव- 9028095500, श्री. पवार गणेश-9970095315 आणि संदीप वांजळे- 9850954237  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
 
Top