उस्मानाबाद :- स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विदयमाने नुकतेच उस्मानाबाद येथे 10 दिवसाचे लाईट मोटार व्हेईकल ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  चंद्रशेखर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली  झाला.
        देशपांडे यांनी यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रशिक्षण घेतलेल्या युवकांनी  वाहनावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात केली तर भविष्यात वाहनाचे अपघात होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक  असल्याचे नमूद करुन पुढील वाटचालीस त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
          यावेळी स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक युवराज गवळी यानी संस्थेचा आढावा घेवून  दुग्ध व्यवसाय व गांडुळ खत निर्मिती व्यवसायाचे प्रशिक्षण 25 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार असून इच्छुक युवकांनी प्रशिक्षणासाठी 7875443799 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. सूत्र संचालन प्रशिक्षणार्थी खंडेराव गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता कांबळे यांनी केले.
 
Top