उस्मानाबाद :- महसूल दिनाच्या आयोजनाचे यजमानपद यावर्षी कळंब तहसील कार्यालयाला मिळाले आहे.  येत्या 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या महसूल दिनाचे साई मंगलम हॉल, कळंब येथे आयोजन करण्यात आले असून यावेळी उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली  हा सत्कार सोहळा होणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा तलाठी संघटना, जिल्हा महसूल अधिकारी संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, कास्ट्रईब महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा वाहन चालक संघटना, जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आणि जिल्हा कोतवाल संघटना यांनी केले आहे.  
 
Top