उस्मानाबाद -: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार, दि. ३१ जुलै २०१४ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन  मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. 
     राज्यातील धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार एसटी प्रवर्गाची सवलत मिळणे आवश्यक असताना धनगड हा शब्द हिंदी असल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज या प्रवर्गात मोडत नसल्याचे सांगितले जात आहे. धनगड आणि धनगर हे दोन्ही शब्द एकच असल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयानेही दिला आहे. असे असताना सवलतीपासून वंचित ठेवण्यासाठी व राजकीय खच्चीकरण करण्यासाठी धनगर समाजाला न्याय दिला जात नाही. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू न केल्यास निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंगे्रस आघाडीला याची किंमत मोजावी लागेल, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या आमरण उपोषणात कमलाकर दाणे, संदीप वाघमोडे, अनिल ठोंबरे, यशवंत डोलारे हे उपोषण करीत आहेत. त्यांना डॉ. गोविंद कोकाटे, राजाभाऊ वैद्य, ऍड. खंडेराव चौरे, आश्रुबा कोळेकर, अमोल गाडे, राहुल कानडे, निळकंठ होळकर, शिवाजी गावडे, सुनिल कानडे, संदीप वाघमोडे, राजाराम तेरकर, पिंटू गायके, अमोल कस्पटे, अनिल ठोंबरे, दत्ता गायके, केशव सलगर, अमोल पाडुळे, पांडूरंग लोकरे, मुकेश कोळेकर, दौलत गाढवे, श्रीकांत मैंदाड, नामदेव गडदे, मनीष वाघमारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे, उस्मानाबादचे तालुकाप्रमुख दिलीप जावळे-पाटील, कॉंग्रेस मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, रूपामाता मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड. व्यंकटराव गुंड, प्रशांत कावरे आदींनी पाठींबा दिला.
 
Top