वैराग - येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे भांडारगृह म्‍हणजे विविध पक्षाच्‍या कार्यकर्त्‍याचे विश्रामगृह अशी ओळख सर्वश्रुत असलेल्‍या या इमारतीमध्‍ये कार्यकर्त्‍याची गर्दी असली तरी नियोजना अभावी प्रवेश दारातच पाणी साठा होवुन त्‍यास तळयाचे स्‍वरूप प्राप्‍त झाले.
  पावसाळयात दरवर्षी बांधकाम विभागाच्‍या भांडारगृहाचे प्रवेशद्वार पाण्‍याच्‍या डबक्‍यात हरवुन जाते. त्‍यामुळे अनेकांना त्‍याचा त्रास सहन करावा लागतो.  सुंदर रस्‍ते व देख्‍ाणे इमारती तयार करण्‍याची जबाबदारी पार पाडण्‍यासाठी कार्यरत असलेले वैरागचे भांडारगृह दुर्लक्षामुळे समस्‍याच्‍या विळख्‍यात सापडले आहे. ही इमारत सोलापूर - बार्शी रस्‍त्‍यावर असुन गटारीची दुरावस्‍था झाल्‍याने इमारतीच्‍या दारतच पाणी साठत आहे. याठिकाणी रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा गटारी नसल्‍याने ऐन पावसाळयात पाणी रस्‍त्‍यावरच साचते तर कधी वाहते, त्‍यामुळे थोडया फार प्रमाणात हा रस्‍ता खचतो , हमरस्‍त्‍यावरचे मुख्‍य कार्यलय असतानाही बार्शी-सोलापूर ,वैराग-माढा , वैराग-हिंगणी,या रस्‍त्‍याच्‍या दुर्ताफा गटारी आहेत. पंरतु संबधितांच्‍या दुर्लक्षामुळे गटारीवर अतिक्रमण झालेले आहे. तरी संबधितानी याकडे जाणीवपुर्वक लक्ष देवुन समस्‍या सोडविण्‍याची मागणी नागरिकातुन केली जात आहे.   
 
Top