नळदुर्ग - सत्‍ताधारी व विरोधकांच्‍या मिलीभगतमुळे तुळजापूर तालुक्‍याच्‍या विकासाची वाट लागली असुन मतदारानी यांचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढुन त्‍यांना त्‍यांची जागा दाखवुन देण्‍याचे आवाहन महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते एस. के. जहागिरदार हे नळदुर्ग परिसरात मनसेच्‍या नुतन शाखा उदघाटन प्रसंगी केले .
    तुळजापूर तालुक्‍यातील  चिवरी (उमरगा), केशेगाव, इटकळ, आरबळी,गुळहळळी , पाटील तांडा, वागदरी, गुजनूर, आरळी (बु), बिजनवावाडी , किलज, शाहपूर , दहिटणा , काळेगाव,येवती , आदिसह पंधरा गावात  महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या शाखा उघडण्‍यात आले आहे.  यावेळी जहागिरदार हे बोलत होते,  ते पुढे म्‍हणाले की, तालुक्‍यात एकही उद्योग धंदा टिकला नाही , त्‍यामुळे सहकार क्षेत्र मोडित निघाले , बेरोजगारी वाढली ,विकासाऐवजी अद्योगतीकडे वाटचाल सुरू आहे.   सत्‍ताधारी मंडळीनी तालुक्‍यात एकही उद्योगधंदा  उभा केला नाही. उलट त्‍यांनी सहकार क्षेत्र मोडित काढुन शेतक-यांना देशोधडीस लावले, तर कामगारांची मोठी गळचेपी केली असे असतानासुध्‍दा विरोधकांनी विरोध केला नाही. शेत‍क-यांच्‍या हितासाठी व सर्वाच्‍या विकासाठी येत्‍या विधानसभा निवडणुकीत सत्‍ताधा-यासह विरोधकांना त्‍यांची जागा दाखवुन देण्‍याचे सांगुन मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली भविष्‍यात तुळजापूर तालुक्‍यात मोठयाप्रमाणात उद्योगधंदे उभारण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे बेरोजगारांना रोजगार उपलब्‍ध होणार असल्‍याचे मनोदय त्‍यानी व्‍यक्‍त केले .
 
Top