उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद जिल्‍हा पत्रकार संघाच्‍या जिल्‍हाध्‍यक्षपदी झी 24 तासचे महेश पोतदार यांची तर सरचिटणीसपदी लोकमतचे  विशाल सोनटक्‍के यांची निवड करण्‍यात आली.
  उस्‍मानाबाद जिल्‍हा पत्रकार संघाच्‍या वतीने  वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते, अध्‍यक्ष अनंत अडसुळ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. यात सन 2014 - 16 साठी नवीन कार्यकारणी एकमतानी निवडण्‍यात आली. उस्‍मानाबाद जिल्‍हा संघाचे अध्‍यक्ष म्‍हणून झी 24 तासाचे जिल्‍हा प्रतिनिधी महेश पोतदार यांची निवड करण्‍यात आली.    अन्‍य पदाधिकारी पुढीलप्रमाणे - उपाध्‍यक्ष देविदास पाठक, स‍हसरचिटणीस जी. बी. राजपूत , कोषाध्‍यक्ष रणजित दुरूगकर ,  प्रांतप्रतिनिधी म्‍हणुन ज्ञानेश्‍वर पंतगे , जिल्‍हा संघटकपदी बालाजी निरफळ , प्रवक्‍ता कालिदास म्‍हेत्रे , कार्यकारणी  सदस्‍य म्‍हणुन सयाजी शेळके, बाळासहेब मुंदडा,  यांची निवड करण्‍यात आली. तर कायम निमंत्रितपदी कमलाकर कुलकर्णी, अनंत अडसुळ, संजय पाटोळे, रविंद्र केसकर, आदिच्‍या निवडी सर्वानुमते करण्‍यात आल्‍या .
खेळीमेळीच्‍या वातावरणात पार पडलेल्‍या या वार्षिक बैठकीस जेष्‍ठ पत्रकार दिलीप पाठक-नारीकर , चंद्रसेन देशमुख, विकास सुर्डी, राजेंद्र बहिरे, आदि सदस्‍य उपस्थि होते. नुतन पदाधिका-यांचा सत्‍कार संघाचे मावळते अध्‍यक्ष अनंत अडसुळ यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.  
 
Top